डिजे समोर नाचण्यास रोखणं जीवावर बेतलं

 


वलिमाच्या कार्यक्रमात डिजे समोर नाचण्यास रोखणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. चिडलेल्या टोळक्याने एका तरुणाचा चाकूने भोसकून निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली आहे

सोमवारी रात्री नांदेडमध्ये ही घटना घडली आहे. शेख मोईस असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. वलिमाच्या कार्यक्रमात डिजे समोर नाचण्यास रोखल्याने टोळक्याने शेख मोईस नावाच्या तरुणाची हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर शेख मोईसच्या नातेवाईकांनी थेट विमानतळ पोलीस ठाण्यातच मृतदेह आणला. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. पोलिसांनी आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिल्याने वातावरण निवळले. नांदेड   शहरातील कर्मवीर नगर भागात शेख नदीम याचा वलिमाचा कार्यक्रम होता.

Post a Comment

0 Comments