प्रेमप्रकरणातून मुलीच्या घरासमोर तलवारीची दहशत

 


प्रेमप्रकरणातून चिडून संबंधित मुलीच्या घरासमोर नंग्या तलवारींनी दहशत निर्माण करत कदमवाडीतील घरावर हल्ला करण्यात आला.

 तलवारी, गज, लाकडी दांडक्यांनी या टोळक्याने हल्ला करत दरवाजा- खिडक्यांचे नुकसान केले.

संबंधित तरुणीला पळवून नेण्याचीही धमकी या संशयितांनी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी संशयित प्रसाद आडुळकर, स्वप्निल आडुळकर, सौरभ कांगिनकर, रोनिक ऊर्फ चिन्या खवरे, आकाश नावळे यांच्यासह आठजणांविरोधात शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कदमवाडी परिसरातील तरुण-तरुणीचे एकमेकांवर प्रेम होते. हे कुटुंबीयांना समजल्याने त्यांनी मुलीला नातेवाईकांच्या घरी पाठवले. या रागातून हल्ला करण्यात आला.

 मुलीच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देत मुलीचे लग्न होऊ देणार नाही, असे सुनावले. शुक्रवारी रात्री उशिरा ही घटना घडली.


Post a Comment

0 Comments