भरधाव एसटी बसची दुचाकीला धडक ; दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यु

 


वर्धा जिल्ह्यात  अपघाताची एक भयंकर घटना घडली.

संत्रा बागेचे परमिट घेण्यासाठी दुचाकीवर निघालेल्या दोन शेतकऱ्यांना भरधाव एसटी बसने जोरदार धडक दिली. या धडकेत दोनही शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. रामदास भलावी आणि प्रल्हाद युवनाते अशी मृत शेतकऱ्यांची नावे आहेत

प्राप्त माहितीनुसार, रामदास भलावी आणि प्रल्हाद युवनाते हे दोनही संत्रा उत्पादक शेतकरी कारंजा येथील कृषी कार्यालयात संत्रा बागेचे परमिट घेण्यासाठी गेले होते. कृषी कार्यालयातून गावाकडे परत जातांना कारंजा घाडगे येथे राष्ट्रीय महामार्गवरील पेट्रोलपंपाजवळ भरधाव एसटी बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील रामदास भलावी याचा जागीच तर प्रल्हाद युवनाते याचा कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालाय. या प्रकरणी कारंजा पोलिसांनी बस चालकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केलीय



Post a Comment

0 Comments