सजावटीसाठी थांबलेल्या ट्रक ला बस ची धडक , एक जण जखमी


रिकिल वणेशा वलके (वय 20, रा.भोसरी ) असे जखमी दुकानदाराचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी रविवारी (दि. 9) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोपं भगवान माने (वय 62, रा. नेहरूनगर, पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे रेडियम आर्टचे दुकान आहे. दसरा सणानिमित्त रेडियम लावण्यासाठी त्यांच्याकडे एक ट्रक आला. ट्रकला रेडियम लावून सजावट करत असताना समोरच्या बाजूला आणखी एक ट्रक येऊन थांबला. दरम्यान आरोपी सोपान माने याने त्याच्या ताब्यातील बस हायगयीने चालवून फिर्यादी काम करत असलेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. त्यामुळे ट्रक पुढे जाऊन समोर उभ्या असलेल्या ट्रेकला धडकला. यात फिर्यादी यांचा पाय सापडल्याने ते गंभीर जखमी झाले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments