मंदिरामध्ये आरती, पूजा सुरू असताना एखादा मुका प्राणी येऊन चक्क माणसाप्रमाणे देवाला नमस्कार करू लागला तर काय होईल. सर्वांनाच नक्की आश्चर्य वाटेल, असाच काहीसा प्रकार समोर आला आहे.
मंदिरात आरती सुरू असताना एक बकरा देवासमोर गुडघे टेकून नतमस्तक झाला आणि पाहणारे अवाक् झाले. एका भाविकाने केलेला हा व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल होत आहे. बकरा देवाला नमस्कार करताना पाहुन लोकांनी आश्चर्य व्यक्त केले. काहींनी तर देवाचा महिमा अगाध असल्याचे म्हटले.
कानपूरच्या बाबा आनंदेश्वर मंदिर (परमट) येथे संध्या आरतीवेळी भक्तीचे अनोखे रूप पाहायला मिळाले. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक बकरा वाकून नमस्कार करण्याच्या मुद्रेत उभा असल्याचे दिसले. भाविक देवाचे नामस्मरण करत असताना त्यांच्यामध्ये हा बकरा नमस्कार करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ इंटरनेटवर खूप चर्चेचा विषय ठरला आहे.
0 Comments