सीमा सुरक्षा दल आणि आसाम पोलिसांच्या संयुक्त पथकाने करिमगंज जिल्ह्यात आज मंगळवारी संयुक्त कारवाई करीत एका ट्रकमधून 45 कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे हेरॉईन जप्त केले, अशी माहिती एका पोलिस अधिकार्याने दिली.
न्यू करिमगंज रेल्वे स्थानकाजवळ एका ट्रकमधून त्रिपुराला जात असलेले हेरॉईन आज पहाटे जप्त करण्यात आले, असे अधिकार्याने सांगितले. प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे बीसएफ आणि करिमगंज पोरिलांच्या कर्मचार्यांनी हा ट्रक रोखला आणि चालकाच्या केबिनमधील गुप्त चेंबरमध्ये लपवून ठेवलेले 764 साबणांच्या डब्यांमध्ये लपवलेले हेरॉईन जप्त केले. या हेरॉईनचे वजन 9.47 किलो असून, आंतरराष्ट्रीय बाजारात याचे मूल्य 47.4 कोटी रुपये आहे. ट्रक चालकास अटक केली असून, त्याची कसून चौकशी सुरू असल्याचे अधिकार्यांनी सांगितले.
0 Comments