पडक्या खोलीत केली गांजाची लागवड

 


खोलीत गांजाची लागवड केल्याचा प्रकार जत तालुक्यातील खंडनाळ येथे उमदी पोलिसांनी उघड केला आहे. याप्रकरणी वृद्धाला अटक करण्यात आली असून, 66 हजारांचा गांजा जप्त करण्यात आला आहे 

हरीबा आप्पा कुलाळ (वय 72, रा. कुलाळवाडी, खंडनाळ, ता. जत) असे अटक केलेल्या वृद्धाचे नाव आहे.

हरीबा कुलाळ हे कुटुंबासमवेत कुलाळवाडी-खंडनाळ येथे राहतात. त्यांच्या घराच्या पूर्वेला जुने घर आहे. तेथील पडक्या खोलीमध्ये कुलाळ यांनी गांजाची लागवड केली होती. याबाबत माहिती मिळाल्यानंतर उमदीचे सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकाने त्याच्या घरावर धाड टाकली. यावेळी गांजाची 12 लहान-मोठी झाडे आढळून आली. हा गांजा 66 हजार 520 रुपये किमतीचा आहे.

याप्रकरणी पोलीस नाईक आर. एस. बन्नेनवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमली पदार्थ कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे, सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार, पोलीस कॉन्स्टेबल नितीन पलुस्कर, आप्पा घोडके, सचिन हक्के, सचिन मासाळ यांनी ही कारवाई केली.Post a Comment

0 Comments