शेतीच्या वाटणीवरून घरात घुसून सराफा व्यापाऱ्यावर चाकूने हल्ला


 दगीर (जि. लातूर) : शहरातील सराफ लाईन भागातील चिल्लरगे गल्लीत शेतीच्या वाटणीवरून घरात घुसून एकावर चाकुने हल्ला केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली.

याप्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी सकाळी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उदगीर शहर पोलिसांनी सांगितले, शहरातील सराफ दुकानदार लक्ष्मण देविदास पोतदार (४५) हे गुरुवारी सायंकाळी त्यांच्या घरामध्ये झोपले असताना आरोपी रोहित व्यंकट पोतदार याने शेतीच्या वाटणीच्या कारणावरून फिर्यादीवर धारधार चाकूने वार करून गंभीर जखमी केले. त्यात ते जखमी झाले.

याप्रकरणी लक्ष्मण पोतदार यांच्या फिर्यादीवरुन शुक्रवारी सकाळी आरोपीविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड हे करत आहेत. या प्रकरणी अद्याप आरोपीस अटक नसल्याचे पोेलिसांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments