मोबाईल, गंठण चोरीला गुन्हा दाखल

 


पहिल्या घटनेत प्रविण सुभाष लांजेवार (वय 42, रा.चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पायी जात असताना अज्ञात दुचाकी चालक आला व त्याने फिर्यादीच्या हातातील 10 हजार रुपयांचा मोबाईल चोरून नेला आहे. हा प्रकार चिखली प्राधिकरण येथे बुधवारी (दि.5) रात्री पावणे दहा वाजता घडला. चिखली पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे.

दुसऱ्या घटनेत महिलेने फिर्याद दिली असून, त्या त्यांच्या मुलीसोबत पायी घरी जात असताना अज्ञात दुचाकीस्वार पाठीमागून आला व त्याने फिर्यादीच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे 50 हजार रुपयांचे सोन्याचे मिनी गंठण हिसकावून नेले. यावरून चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments