अवैध धंद्यांवर छापे,१४ आरोपींना अटक

 


पुणेः हडपसर पोलिसांनी अवैध धंदयावर छापे टाकले असून, साडे आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शिवाय, १४ आरोपींना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

हातभट्टी दारु विक्रेता दादाराव गोरख गोरे (वय ४३ रा. स. न. ४०५, डांगमाळीं आळी, हडपसर पुणे) हा पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचे विरूध्द यापुर्वी अवैध्द रित्या दारू विक्रीचे एकुण ०७ गुन्हे हडपसर पोलिस स्टेशन येथील आहेत. आरोपी दादा गोरख गोरे याने त्याच्या वरील दाखल गुन्हे हे अवैध मार्गाने आर्थिक फायदा व्हावा या करीता केलेला असल्याचे तपासात निष्पन्न होत असल्याने त्यांचे विरुध्द पोलिस उप आयुक्त परि. ०५, पुणे शहर यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ५६ (१), (ब-ब) अन्वये त्यांच्याकडील कडील तडीपार आदेश क्र. ४२ / २०२२, दिनांक २७/०९/२०२२ रोजी पासून नमुद व्यक्तीस पुणे शहर व पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय तसेच पुणे जिल्हा हद्यीतुन २ (दोन) वर्षाकरिता तडीपार करण्यात आलेले आहे.

Post a Comment

0 Comments