बापरे लोकांच्या घरात सोडले रॉकेट

 दिवाळीत सर्वत्र फटाके फुटताना पाहायला मिळत आहे. फटाके फोडताना केलेली एक छोटीशी चूक जीवघेणी ठरू शकते. असं असताना काही लोक मात्र फटाक्यांसोबत नको ते खेळ खेळतात.

त्यातच आता सोशल मीडियावर एका माथेफिरूचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतो आहे. 

हा व्हिडीओ पाहून पोलीसही  हादरले आहेत.सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत तर तरुणाने हद्द पार केली आहे. त्याने फक्त स्वतःचाच नव्हे तर कित्येक लोकांचा जीव धोक्यात टाकला आहे. ही घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे.

एका माथेफिरूने एका रहिवासी इमारतीवर मध्यरात्रीच्या सुमारास फटाक्यांचे रॉकेट डागल्याची घटना घडली. हे रॉकेट्स थेट नागरिकांच्या घरात जाऊन फुटल्याने नागरिकांमध्ये मोठं भीतीचं वातावरण निर्माण झालं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल चांगलाच व्हायरल झाला आहे.

उल्हासनगरच्या गोल मैदान परिसरात हिरापन्ना अपार्टमेंट नावाची इमारत आहे. या इमारतीवर सोमवारी पहाटे सव्वादोन ते अडीचच्या सुमारास एका अज्ञात माथेफिरूने फटाक्यांचे रॉकेट सोडले. इमारतीच्या बाहेर हातात रॉकेटचा बॉक्स घेऊन हा माथेफिरू उभा होता आणि त्यातून सुटणारे रॉकेट्स थेट नागरिकांच्या बाल्कनीवर हा माथेफिरू सोडत होता. हे रॉकेट्स नागरिकांच्या घरात जाऊन फुटत होते. 

Post a Comment

0 Comments