आईच्या डोक्यात लाकडी ओंडका फेकला, मुलाचे भयानक कृत्य

 


यानंतर वयोवृद्ध आईने दिलेल्या तक्रारीनंतर संबंधित मुलाविरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, मारहाणीचे ठोस कारण अद्यापही समोर आले नाही.

दिलीप जाधव असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी मुलाचे नाव आहे. याप्रकरणी त्याची वयोवृद्ध आहे वैजंता जाधव यांनी फिर्याद दिली आहे. 22 ऑक्टोबर रोजी हा सर्व प्रकार घडला.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, 24 ऑक्टोबर रोजी आरोपीने आईला शिवीगाळ करत दमदाटी केली. त्यानंतर शेजारीच पडलेला लाकडी उंडका उचलून आईच्या डोक्यात मारला. यानंतर फिर्यादी महिलेला चक्कर येऊ लागल्याने त्यांना 25 ऑक्टोबर रोजी इंदापुरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल


झाल्यानंतर संबंधित मुलाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. त्याच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी ही मागणी केली जात आहे. इंदापूर पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments