लक्झरी बसमध्ये आग पेटली

 


रांचीमध्ये आज रात्री एक हृदयद्रावक घटना घडली आहे. लोअर बाजार पोलीस ठाणे भागात खादगढा बस स्टँडवर बसमध्ये झोपलेल्या ड्रायव्हर आणि कंडक्टरचा जळून मृत्यू झाला आहे. दिवाळीच्या रात्री बसमध्ये हे दोघे दिवे लावून झोपले होते, असे सांगितले जात आहे.

रात्री अचानक बसला आग लागली. यामुळे त्यांचा होरपळून मृत्यू झाला. बसला आग लागल्याची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाला याची माहिती देण्यात आली. अग्निशमन दल पोहोचेपर्यंत बस जळून खाक झाली होती. पोलिसांनी बसमध्ये सापडलेल्या अर्धावस्थेत जळालेले दोन मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठविले आहेत.

दिवाळीच्या रात्री आगी लागण्याच्या देशभरात अनेक घटना घडल्या आहेत. यात काही जणांना गंभीर दुखापती देखील झाल्या आहेत. दिल्लीतील पितमपुरा भागातील एका रेस्टॉरंटलाही आग लागली होती. गोदामे, गाड्या, घरांना आगी लागल्याच्या घटना घडल्या आहेत.

Post a Comment

0 Comments