आगीशी खेळ अंगाशी आला , फुंक मारताच तरुण पेटला

 


काही लोक पोटासाठी तर काही प्रसिद्धीसाठी आपला जीव धोक्यात घालतात आणि खतरनाक स्टंट करतात. अशाच स्टंटपैकी एक म्हणजे फायर स्टंट. असाच फायर स्टंट म्हणजे आगीशी खेळ एका तरुणाच्या अंगाशी आला आहे.

फुंक मारून आग भडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या तरुणाच्या चेहऱ्यावर आग भडकली आणि त्याचा चेहरा पेटला. हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. आगीशी स्टंट करतानाचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असातत. नुकताच व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहूनच तुम्हाला धडकी भरेल.

आगीशी खेळ उलटा पडला आणि तरुणाचा जीव धोक्यात अडकला. त्यानंतर एकच खळबळ उडाली. व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर शहारा येईल. 

Post a Comment

0 Comments