बायको आत्महत्या करत होती तो व्हिडिओ बनवत होता

 


उत्तर प्रदेशमधल्या कानपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एक विवाहित महिला फाशी घेऊन आत्महत्या करत होती. मात्र तिचा नवरा चक्क व्हीडिओ काढत होता. अखेर या घटनेमध्ये पत्नीचा मृत्यू झाला आहे 

कानपूर येथील हनुमंत विहार पोलिस ठाण्यात हद्दीत ही घटना घडली. येथील संजीव गुप्ता हे खाजगी कंपनीत जॉब करतात. चार वर्षांपूर्वी त्यांचं लग्न राज किशोर गुप्ता यांची मुलगी शोभिता हिच्याशी झालं. मागील काही महिन्यांपासून पती-पत्नीमध्ये वाद सुरु होता. काल मंगळवारी शोभिताने पतीसमोरच आत्महत्या केली. संजीवने तिला रोखण्याऐवजी चक्क घटनेचा व्हीडिओ केला. शोभिताने आत्महत्या केल्यानंतर संजीवने सासऱ्याला फोन लावून शोभिताने आत्महत्या केल्याचं सांगितलं.

मृत शोभिताचे वडील राज किशोर यांनी सांगितलं की, जावई संजीव यांचा मंगळवारी दुपारी फोन आला. शोभिताने आत्महत्या केल्याचं त्यांनी सांगितलं. जेव्हा आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा शोभिताचं पार्थिव जमिनीवर होतं. संजीवला याबाबत विचारल्यानंतर त्याने व्हीडिओ दाखवल्याचं राज किशोर गुप्ता यांनी सांगितलं.
Post a Comment

0 Comments