भरधाव जाणाऱ्या ट्रकला धडकला गेंडा , व्हिडिओ पाहून लोक संतापले


भरधाव जाणाऱ्या वाहनांमुळे जनावरांचा जीव धोक्यात आहे. राष्ट्रीय महामार्गापासून ते अ‍ॅनिमल कॉरिडॉरपर्यंत काही वाहनचालक एवढ्या बेसावधपणे वाहने चालवतात की, त्याचा फटका प्राण्यांना सहन करावा लागतो.

रस्ता ओलांडताना वाहने, ट्रक इत्यादींची धडक बसून बिबट्यापासून हरणासारखे अनेक प्राणी जखमी होतात किंवा त्यांचा मृत्यू होतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय,

सोशल मीडीयावर व्हायरल होणारा व्हिडीओ आसाममधला आहे, जिथे एक ट्रक रस्ता ओलांडणाऱ्या गेंड्यावर धडकला. एवढंच नाही तर गेंडयाला मारल्यानंतर तो निराधार प्राण्याला तसंच सोडून पळून गेला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या घटनेबाबत लोकांमध्ये संताप व्यक्त होत असून, लोकांनी सावधपणे वाहने चालवावे, असे नेटकरी सांगत आहेत.

Post a Comment

0 Comments