सोलापुर : भाजपा सोलापूर शहर महिला मोर्चा वतीने पंतप्रधानांना पाठवली आभार मानणारी दोनशेSolapur - जाहीर केलेल्या योजनांची अंमलबजावणी केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi)यांना या पत्रांतून धन्यवाद देण्यात आले आहेत.पंतप्रधानांचे आभार मानणारी सोलापुरातून दोनशे पत्र; बहुतांश पत्रातून मोदींच्या कामाचे कौतुक कोरोना (corona) काळात मोदी सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक योजना जाहीर केल्या होत्या.

त्याची अंमलबजावणी झाल्यावर योजनांचा लाभही भारतीयांना मिळाला. त्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागातील नागरिकांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानणारी दोनशे पत्र त्यांना पाठवली आहेत.

बहुतांश पत्रांमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या आजवरच्या कामाचे कौतुक करण्यात आले आहे. तसेच मोफत अन्नधान्य वितरण, घरोघरी जाऊन लसीकरण, आणि महिलांच्या नावाने जनधनच्या खात्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी केल्याबद्दल मोदी यांना या पत्रांतून धन्यवाद देण्यात आले आहेत. आरोग्य क्षेत्रात आणखी काम करण्याची गरज या पत्रांतून व्यक्त करण्यात आली आहे. पत्र लिहिणाऱ्यांमध्ये भाजपच्या समर्थकांशिवाय काही सर्वसामान्य नागरिकांचाही समावेश आहे.


भाजपा सोलापूर शहर सरचिटणीस शशी भाऊ थोरात यांच्या हस्ते पत्रं पोस्टात टाकण्यात आली. प्रसंगी महिला मोर्चा अध्यक्ष इंदिराताई कुडक्याल, उपाध्यक्ष विजयाताई वड्डेपल्ली, उपाध्यक्ष प्रशांत फत्तेपुरकर, सेवा पंधरवडा संयोजक प्रवीण कांबळे, सहसंयोजक व शहर चिटणीस नागेश सरगम, नगरसेविका अंबिका पाटील ,गोपीकृष्णा वड्डेपल्ली , जनसेवक राजकुमार पाटील, शहर उत्तर पश्चिम मंडल सरचिटणीस शेखर फंड, चिटणीस निलेश शिंदे, आदींसह लाभार्थी महिला उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments