स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमात लोकसहभाग महत्वाचा-प्रांताधिकारी गजानन गुरव

 


 पंढरपूर, दि.29 (उमाका):-भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पुर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरुपी जनमानसात रहावी,  स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटनांचे स्मरण व्हावे या उद्देशाने  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव राज्यभरात राबविण्यात येत आहे.  जिल्ह्यात दिनांक 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत केंद्र शासनाच्या सूचनेनुसार ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.या उपक्रमात लोकसहभाग महत्वाचा असून, तालुक्यातील सर्व नागरिकांनी या उपक्रमात आपला सहभाग  नोंदवावा असे, आवाहन प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी केले आहे.


 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम संपूर्ण तालुक्यात राबविण्याबाबतच्या नियोजनासंदर्भात, सांस्कृतिक भवन, प्रांत कार्यालय, पंढरपूर येथील आयोजित बैठकीत श्री गुरव  बोलत होते. यावेळी तहसिलदार सुशिल बेल्हेकर, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, मुख्याधिकारी अरविंद माळी तसेच तालुक्यातील मंडलाधिकारी, ग्रमासेवक, तलाठी आदी उपस्थित होते.

  यावेळी बोलताना प्रातांधिकारी गुरव म्हणाले, या उपक्रमासाठी तालुक्यात बचत गटाच्या माध्यमातून  तिरंगा ध्वज उपलब्ध करुन देण्यात असून, प्रत्येक गावांत तसेच शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी ध्वज विक्रीसाठी स्टॉल लावले जाणार आहेत. तालुक्यातील सर्व घरे, शासकीय कार्यालय, प्राथमिक माध्यमिक शाळा, खाजगी आस्थापना आदी इमारतींवर राष्ट्रध्वज उभारण्यासाठी करण्यात आले असून,   गावातील सर्व कुटुंबांनी सक्रीय सहभाग नोंदविण्यासाठी गावामध्ये ग्रामसभा, प्रभात फेरी आदींचे आयोजन करुन या उपक्रमाबात जनजागृती करावी अशा सूचना प्रांताधिकारी गुरव यांनी दिल्या तसेच  नागरिकांनी राष्ट्रध्वज संहितेचे काटेकोर पालन करावे असे, आवाहनही यावेळी त्यांनी केले.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रमासाठी  प्रत्येक गावात वार्डनिहाय  समिती स्थापन करण्यात आली असून, या समिती मार्फत गृहभेटी देवून प्रत्येक घरांसाठी  राष्ट्रध्वजाची  मागणी नोंदविण्यात येत आहे. ग्रामस्तरावर 47 हजार राष्ट्रध्वज फडकविण्याचे नियोजन असून, केंद्र शासनाने दिलेल्या सूचनेनुसार राष्ट्रध्वज 21/- रुपये दराने बचत गटाकडून उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत यासाठी  नागरिकांनी तात्काळ मागणी नोंदवावी असे आवाहन गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांनी केले आहे.   

‘हर घर तिरंगा’ हा उपक्रमासाठी केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार  शहरातील प्रत्येक शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनावर तसेच प्रत्येक घर व इमारतीवर राष्ट्रध्वज उभारण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. शहरात 10 हजार राष्ट्रध्वज फडकविण्याचे नियोजन असून लायन्स क्लब, रोटरी क्लब, व्यापारी संघटना तसेच पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटना व कर्मचाऱ्यांच्या वतीने प्रत्येक कर्मचारी यांच्यावतीने राष्ट्रध्वज उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. प्रत्येक नागरिकांना  राष्ट्रध्वज उपलब्ध व्हावेत यासाठी नगरपरिषदेच्या वतीने बचतगटांना स्टॉलसाठी जागाही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी दिली.

Post a Comment

0 Comments