○ सोलापूर विद्यापीठ आयोजित सृजनरंग स्पर्धेत अद्विक मधील पारितोषिक वितरण सोहळा
पंढरपूर: प्रमोद बनसोडे
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर मधील ४१ विद्यार्थ्यांना सृजनरंग स्पर्धेत अद्विक मधील पारितोषिक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या वतीने आयोजित सृजनरंग स्पर्धेत विजयी स्पर्धकांचा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता या कौतुक सोहळ्याचे प्रास्ताविक करताना अधिष्ठाता डॉ. संपत देशमुख म्हणाले, पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज च्या स्थापनेपासून अद्विक मधील पारितोषिक मिळविण्यात सिंहगड महाविद्यालय सहभाग घेऊन बक्षीस प्राप्त केले आहे. अभियांत्रिकीत विभागातून प्रथम क्रमांक पंढरपूर सिंहगडच्या अद्विक या नियतकालिकाला मिळाले आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हि स्पर्धा आयोजित करण्यात येत असते. या स्पर्धेत सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मधील अद्विक ला ४१ विद्यार्थांना बक्षीस मिळाले असल्याचे प्रास्ताविक मध्ये अधिष्ठिता डाॅ. संपत देशमुख यांनी सांगितले.
या सोहळ्यात प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डाॅ. स्वानंद कुलकर्णी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यादरम्यान उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सृजनरंग स्पर्धेत विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह देऊन अभिनंदन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रा. अंजली चांदणे व प्रा. वैष्णवी उत्पात यांनी केले.
0 Comments