मुंबईत पोलीस हाय अलर्ट.... शिवसैनिक रस्त्यावर !

मुंबईकर जनतेने ११८ पेक्षा जास्त जागा जिंकून देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर ( bjp win mumbai corporation election ) बसेल, असा विश्वास भाजप आमदार अमित साटम यांनी व्यक्त केला ( bjp mla amit satam ) आहे.


शिवसेनेतील या बंडखोरीचा परिणाम आगामी काळातही महाराष्ट्राच्या राजकारणात राहणार आहे. त्यामुळे पोलिसांना हाय अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिवसैनिकांना हिंसाचार पसरवण्यापासून रोखले नाही तर राष्ट्रपती राजवटीची शिफारस करण्याची संधी केंद्राला मिळेल आणि सत्ता वाचवण्यासाठी सध्याच्या सरकारला कोणताही आधार नाही, असे महाविकास आघाडी सरकारमधील अनेकांचे मत आहे.


मुंबईत प्रमुख नेत्यांच्या घरांवर आणि चौकांमध्ये सुरक्षा दुप्पट करण्यात आली आहे, पोलिसांनी कोणत्याही हिंसक निदर्शनांवर नजर ठेवली आहे.


मुंबईत कलम 144 लागू करण्यात आले आहे. हिंसक बॅनर-पोस्टर तातडीने हटवण्याचे आदेश दिले असून कलम 144 लागू असताना मुंबई पोलीस सर्व राजकीय पक्षांच्या कार्यालयांना सुरक्षा पुरवणार आहेत. मुंबई पोलिस सोशल मीडियावर सतत लक्ष ठेवून आहेत.

Post a Comment

0 Comments